पोस्ट्स

पुस्तक परिचय -माझे विद्यार्थी 💐लेखक - रघुराज मेटकरी

इमेज
एखाद्या शिक्षकाच्या आयुष्यात त्याचे विद्यार्थी हीच मोठी संपत्ती असते.बऱ्याच वेळा आपण असे म्हणतो की शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात,पण काही वेळा शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात.विद्यार्थी हा शिक्षकांसाठी कधी लेकरू असत तर कधी समाजातील अडचणींचे प्रतिनिधित्व करणारा घटक असतो. अशावेळी ही माऊली शाळेचे कुंपण ओलांडून या विद्यार्थ्याच्या आयुष्यात डोकावते आणि ... मग पुढच्या खडतर प्रवासात एकमेकांना साथ  देत ते समाजच देणं देऊन जाते... शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती असते,समाजातील प्रश्न हेदेखील शाळेत येऊन उभे राहतात.अशावेळी राष्ट्रीय उत्तरे शोधण्यापेक्षा 'मी काय करू शकतो?'हे उत्तर शोधले.आत्मकेंद्रित आणि हरवलेल्या शिक्षण व्यवस्थेला या पुस्तकाचा हाच सांगावा आहे. आता वाचकांना देखील उत्सुकता निर्माण झाली असेल की कसा आहे हा प्रवास? आपल्या या प्रवासातला पहिला प्रवासी आहे.. गजानन विष्णू लोखंडे खरंतर भांडखोर पण अभ्यासात देखील तेवढाच हुशार... पुस्तक, दप्तर अशा सगळ्या गोष्टींना मनापासून जपणारा.. नाटकात देखील उत्तम कामगिरी केली आणि शाळेला जिल्ह्यात नंबर मिळवून दिला. पण इयत्ता चौथीमध्ये असताना अचानक शाळेत ...

पुस्तक परिचय : रावणायन

इमेज
सामन्यात: आपल्या सर्वांना रामायण परिचित आहे.परंतु रामायण म्हणलं की आपल्याला आठवते ते सीता-हरण आणि रावणाचा वध.  रामायण म्हणजे रावणाबद्दल प्रचंड राग..  अर्थात तो साहजिकच आहे.परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला का,की रावण असा का वागला? रावण कट्टर शिवभक्त असताना देखील असा का वागला? खरतर अत्यंत पराक्रमी ,कुशल राजनीतीतज्ञ,प्रचंड शक्तिशाली आणि महाज्ञानी असे हे व्यक्तिमत्व परंतु अशा योध्याचा पराजय झाला!  खरतर मंदोदरीवर अत्यंत निर्मळ प्रेम करणारा रावण..  पण सीतेची अभिलाषा त्याने का धरली?आणि सीतेच्या अभिलाशेपोटी सीतेचे हरण झाले की काही अन्य कारण होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी रावणायन हे पुस्तक हाती घेतले,आणि खूप नवीन गोष्टींचा उलगडा झाला.  खरंतर या कथेची सुरुवात होते दोन ऋषीपुत्र जय आणि विजय यांच्या विष्णूभक्तीतून .या विष्णूभक्तांनी विष्णूची तपश्चर्या केली आणि विष्णू प्रसन्न झाले,  "आम्हाला अनंत काळापर्यंत तुमच्याजवळ राहायचे आहे" असा वर मागितला.परंतु विष्णू वैकुंठवासी,तेथे कुणालाही प्रवेश नाही.आणि मग विष्णू देवांनी त्यांना द्वारपाल केले. जय - विजय हे व...

पुस्तक परिचय : भारतीय संस्कृती भाग १

भारतीय संस्कृती लेखक : प.पु.साने गुरुजी कृष्णाष्टमी १८५९ २९ ऑगस्ट १९३७       भारतीय संस्कृती हा शब्द जेव्हा आपण ऐकतो,तेव्हा या शब्दांचा अर्थ काय? तर भारतीय संस्कृतीची आयुष्याकडे बघण्याची विशेष दृष्टी या पुस्तकात अतिशय सोप्या शब्दात मांडली आहे.ज्ञान-विज्ञानास हृदयाची जोड देऊन संसारात मधुरता पसरू पाहणारी ही संस्कृती आहे.     खरतर पुस्तकाचे नाव वाचताना हे पुस्तक समजेल का असे वाटते,परंतु पुस्तक वाचायला सुरुवात केल्यानंतर असे वाटते कि साने गुरुजींनी किती सोप्या शब्दात आणि आजही लागू होणारी उदाहरणे देऊन भारतीय संस्कृती वाचकांपर्यंत पोचवली आहे. अद्वैत  अधिष्ठान  : अद्वैत म्हणजे माझ्यासारखाच दुसरा आहे ही भावना. आपणास येणाऱ्या सुख-दुःखाच्या अनुभवावरून दुसऱ्याच्या सुख-दुःखाची कल्पना येणे म्हणजे अद्वैत मला मन बुद्धी,हृदय आहे त्याप्रमाणे दुसऱ्यालाही असेल ही भावना म्हणजे अद्वैत मला ज्या गोष्टींनी दु:ख होते ती मी दुसऱ्यांच्या बाबतीत करणार नाही म्हणजे अद्वैत. ही सृष्टी आपणास अद्वैत शिकवत आहे,जसे मेघ सारे पाणी देऊन टाकतात,वृक्ष फळे...