पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुस्तक परिचय : भारतीय संस्कृती भाग १

भारतीय संस्कृती लेखक : प.पु.साने गुरुजी कृष्णाष्टमी १८५९ २९ ऑगस्ट १९३७       भारतीय संस्कृती हा शब्द जेव्हा आपण ऐकतो,तेव्हा या शब्दांचा अर्थ काय? तर भारतीय संस्कृतीची आयुष्याकडे बघण्याची विशेष दृष्टी या पुस्तकात अतिशय सोप्या शब्दात मांडली आहे.ज्ञान-विज्ञानास हृदयाची जोड देऊन संसारात मधुरता पसरू पाहणारी ही संस्कृती आहे.     खरतर पुस्तकाचे नाव वाचताना हे पुस्तक समजेल का असे वाटते,परंतु पुस्तक वाचायला सुरुवात केल्यानंतर असे वाटते कि साने गुरुजींनी किती सोप्या शब्दात आणि आजही लागू होणारी उदाहरणे देऊन भारतीय संस्कृती वाचकांपर्यंत पोचवली आहे. अद्वैत  अधिष्ठान  : अद्वैत म्हणजे माझ्यासारखाच दुसरा आहे ही भावना. आपणास येणाऱ्या सुख-दुःखाच्या अनुभवावरून दुसऱ्याच्या सुख-दुःखाची कल्पना येणे म्हणजे अद्वैत मला मन बुद्धी,हृदय आहे त्याप्रमाणे दुसऱ्यालाही असेल ही भावना म्हणजे अद्वैत मला ज्या गोष्टींनी दु:ख होते ती मी दुसऱ्यांच्या बाबतीत करणार नाही म्हणजे अद्वैत. ही सृष्टी आपणास अद्वैत शिकवत आहे,जसे मेघ सारे पाणी देऊन टाकतात,वृक्ष फळे...