पुस्तक परिचय -माझे विद्यार्थी 💐लेखक - रघुराज मेटकरी
एखाद्या शिक्षकाच्या आयुष्यात त्याचे विद्यार्थी हीच मोठी संपत्ती असते.बऱ्याच वेळा आपण असे म्हणतो की शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात,पण काही वेळा शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात.विद्यार्थी हा शिक्षकांसाठी कधी लेकरू असत तर कधी समाजातील अडचणींचे प्रतिनिधित्व करणारा घटक असतो. अशावेळी ही माऊली शाळेचे कुंपण ओलांडून या विद्यार्थ्याच्या आयुष्यात डोकावते आणि ...
मग पुढच्या खडतर प्रवासात एकमेकांना साथ देत ते समाजच देणं देऊन जाते...
शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती असते,समाजातील प्रश्न हेदेखील शाळेत येऊन उभे राहतात.अशावेळी राष्ट्रीय उत्तरे शोधण्यापेक्षा 'मी काय करू शकतो?'हे उत्तर शोधले.आत्मकेंद्रित आणि हरवलेल्या शिक्षण व्यवस्थेला या पुस्तकाचा हाच सांगावा आहे.आता वाचकांना देखील उत्सुकता निर्माण झाली असेल की कसा आहे हा प्रवास?
आपल्या या प्रवासातला पहिला प्रवासी आहे..
गजानन विष्णू लोखंडे
खरंतर भांडखोर पण अभ्यासात देखील तेवढाच हुशार...
पुस्तक, दप्तर अशा सगळ्या गोष्टींना मनापासून जपणारा..
नाटकात देखील उत्तम कामगिरी केली आणि शाळेला जिल्ह्यात नंबर मिळवून दिला.
पण इयत्ता चौथीमध्ये असताना अचानक शाळेत यायचा बँद झाला.का?
गोरक्ष पाटील
✔️एकपाठी विद्यार्थी
धडा एकदा वाचला की त्याच्या लक्षात राही
दोनदा वाचला तर स्वल्पविराम, पूर्णविराम यांसह तो ध्यानात ठेवी.
कितीही मोठ्या बेरजा सांगा काही क्षणात उत्तर तयार
पेपरमधील कोडी सोडवणे हा छंद
गणितात भारती विद्यापीठ परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला
विज्ञान प्रयोग करायची भारी आवड
इयत्ता सातवीत असताना प्रत्येक पेपरमध्ये पैकीच्या पैकी गुण...
असा हा गोरक्ष सातवीच्या केंद्रात जिल्ह्यात पहिला आला आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिला आला,शाळेला स्वतः शिक्षण अधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांचे अभिनंदन पत्र मिळाले
आणि.......😢
सातवी पास होताच गोरक्ष.....
काय झाले पुढे या गोरक्षचे,नक्की वाचा..
खरंतर आपल्याला असे वाटेल की शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींसाठी हे पुस्तक आहे की काय?पण नाही,शाळा हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा विषय.
आजही आपण आपले डोळे बंद केले तर आयुष्यातील सुवर्णकाळ म्हणजे आपला शाळेतील प्रवास असे वाटते.
तुम्हालाही असे वाटते का?नक्की सांगा
शिक्षक आणि समाजाचे अदभुत नाते उलगडून दाखवणारा हा प्रवास नक्की अनुभवा...
लेखक -रघुराज मेटकरी
विटा,जिल्हा - सांगली
चित्रकार-गिरीश सहस्त्रबुद्धे
प्रकाशन - साधना
साधना संपादक - विनोद शिरसाठ
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा