पुस्तक परिचय : रावणायन
सामन्यात: आपल्या सर्वांना रामायण परिचित आहे.परंतु रामायण म्हणलं की आपल्याला आठवते ते सीता-हरण आणि रावणाचा वध.
रामायण म्हणजे रावणाबद्दल प्रचंड राग..
अर्थात तो साहजिकच आहे.परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला का,की रावण असा का वागला?
रावण कट्टर शिवभक्त असताना देखील असा का वागला?
खरतर अत्यंत पराक्रमी ,कुशल राजनीतीतज्ञ,प्रचंड शक्तिशाली आणि महाज्ञानी असे हे व्यक्तिमत्व परंतु अशा योध्याचा पराजय झाला!
खरतर मंदोदरीवर अत्यंत निर्मळ प्रेम करणारा रावण..
पण सीतेची अभिलाषा त्याने का धरली?आणि सीतेच्या अभिलाशेपोटी सीतेचे हरण झाले की काही अन्य कारण होते?
या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी रावणायन हे पुस्तक हाती घेतले,आणि खूप नवीन गोष्टींचा उलगडा झाला.
खरंतर या कथेची सुरुवात होते दोन ऋषीपुत्र जय आणि विजय यांच्या विष्णूभक्तीतून .या विष्णूभक्तांनी विष्णूची तपश्चर्या केली आणि विष्णू प्रसन्न झाले, "आम्हाला अनंत काळापर्यंत तुमच्याजवळ राहायचे आहे" असा वर मागितला.परंतु विष्णू वैकुंठवासी,तेथे कुणालाही प्रवेश नाही.आणि मग विष्णू देवांनी त्यांना द्वारपाल केले.
जय - विजय हे विष्णूचे वैकुंठ भूमितील द्वारपाल. परंतु सनत ऋषींनी त्यांना शाप दिला - "पृथ्वीतलावर चालते व्हा!"
जय आणि विजय यांना विष्णूंना सोडून कुठेच जायचे नव्हते,परंतु शापामुळे त्यांना पृथ्वीवर परत जावे लागणार हे जाणताच त्यांनी विष्णुदेवांचा त्यांनी धावा केला.
"माझ्यावरची भक्ती जर तुम्हाला पृथ्वीवरच्या अस्तित्वात देखील कायम ठेवायची असेल ,माझे भक्त म्हणून जर तुम्हाला तिथं जगायच असेल तर तिथं सात जन्म घ्यावे लागतील. माझा शत्रू व्हायच असेल तर तीन जन्म घ्यावे लागतील.पण मग मला तुम्हाला ठार मारावे लागेल. "
जय विजय यांनी विचार करून प्रश्न विचारला,"आम्ही तुमचे भक्त झालो काय,शत्रू झालो काय,इथेच परत येणार,नक्की ना?"
"अर्थात,याच स्थानावरून जाणार आणि याच स्थानावर परत येणार"
शेवटी विष्णुभक्तच ते!म्हणाले ,"सात जन्म तुमच्यापासून दूर राहण्यापेक्षा तीन जन्म बरे.करा आमचा वध.
पहिला जन्म -
जय आणि विजय ..
पृथ्वीवर हिरण्याकशपू आणि हिरण्याकक्ष हे दोन भाऊ जन्माला आले.
पुढचा जन्म रामायणातील ..
या जन्मात जय विजय कोण ?
रावणाचा आणि जय विजय यांचा काही संबंध आहे का ?
उत्सुकता अधिक न ताणता सांगते, विश्रव व कैकेशी या पती-पत्नींचा ऋषीपुत्र म्हणजे दशानन. आणि दशानन म्हणजेच रावण.
रावण हे शंकराने दशाननाला दिलेले नाव !
लंकाधिपती सुमाली हे रावणाचे आजोबा ,खरंतर आपल्याला रामायणातील अत्यंत दुःखद वाटणारी गोष्ट म्हणजे श्रीराम आणि सीतामाई यांचा एकमेकांशी फारच थोडा काळ झालेला संसार.
याचे कारण म्हणजे सीतेचा पुनर्जन्म!
कोण होती सीता ?
ब्रह्मश्री कुशध्वज यांची कन्या म्हणजेच वेदवती.
सीता हा वेदवतीचा पुनर्जन्म.
या वेदवतीने रावणाला दिलेल्या शापामुळे काय काय घडले ?हे जरूर पुस्तकात वाचा.
दशरथ राजांना शांता नावाची एक कन्या होतीL परंतु त्यांना पुत्र हवा होता आणि चित्ररथ राजाला पुत्र होते परंतु कन्या नव्हती.कन्येसाठी झुरणाऱ्या चित्ररथाला दशरथाने स्वतःची कन्या शांता एक वर्षाची असताना देऊन टाकली.पुढे या शांताचे काय झाले हे खरंच वाचनीय आहे.
या पुस्तकात संपूर्ण रावणाचे चरित्र कथानक रूपात मांडलेले आहे. कथा लेखन हे उत्सुकता वाढवणारे आहे ,त्यामुळे पुस्तक वाचताना आता पुढे काय ?अशी उत्सुकता सतत राहते.
श्री रामाची मंदिरे भारतात खूप ठिकाणी आहेत परंतु भारतात उत्तर प्रदेशातील बिस्त्र या गावी रावणाचे मंदिर आहे. उत्तर प्रदेशात कानपुर येथेही रावणाचे मंदिर आहे. आंध्रप्रदेशात काकीनाडा येथे शिव मंदिरात मोठे शिवलिंग आहे जवळच रावणाचा देखील एक पुतळा बांधलेला आहे.
अजून भारतात कोठे कोठे रावणाची मंदिरे आहेत हे जाणण्यासाठी जरूर हे पुस्तक वाचा.
रावणायन जेवढे मनोरंजनासाठी आहे ,तेवढेच विचार परिवर्तनासाठी देखील आहे सोबत या पुस्तकाची लिंक दिलेली आहे तेथून तुम्ही त्या पुस्तकाची ऑर्डर करू शकता
अवश्य वाचा पुस्तक
रावणायन
वाचनसंस्कृती वाढावी आणि जपावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न : पुस्तक परिचय💐
एवम वदती पुस्तकम या पुस्तक परिचय मालेतील वाचकांना हा पुस्तक परिचय कसा वाटला याचा अभिप्राय वाचायला मला नक्की आवडेल.
पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील link वर click करा.

खूपच छान
उत्तर द्याहटवाहे पुस्तक मी वाचलं नाही , पण आता उत्सुकता चाळवली . हे पुस्तक वाचून नंतरच त्यावर अभिप्राय देईन !
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवा