पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुस्तक परिचय -माझे विद्यार्थी 💐लेखक - रघुराज मेटकरी

इमेज
एखाद्या शिक्षकाच्या आयुष्यात त्याचे विद्यार्थी हीच मोठी संपत्ती असते.बऱ्याच वेळा आपण असे म्हणतो की शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात,पण काही वेळा शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात.विद्यार्थी हा शिक्षकांसाठी कधी लेकरू असत तर कधी समाजातील अडचणींचे प्रतिनिधित्व करणारा घटक असतो. अशावेळी ही माऊली शाळेचे कुंपण ओलांडून या विद्यार्थ्याच्या आयुष्यात डोकावते आणि ... मग पुढच्या खडतर प्रवासात एकमेकांना साथ  देत ते समाजच देणं देऊन जाते... शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती असते,समाजातील प्रश्न हेदेखील शाळेत येऊन उभे राहतात.अशावेळी राष्ट्रीय उत्तरे शोधण्यापेक्षा 'मी काय करू शकतो?'हे उत्तर शोधले.आत्मकेंद्रित आणि हरवलेल्या शिक्षण व्यवस्थेला या पुस्तकाचा हाच सांगावा आहे. आता वाचकांना देखील उत्सुकता निर्माण झाली असेल की कसा आहे हा प्रवास? आपल्या या प्रवासातला पहिला प्रवासी आहे.. गजानन विष्णू लोखंडे खरंतर भांडखोर पण अभ्यासात देखील तेवढाच हुशार... पुस्तक, दप्तर अशा सगळ्या गोष्टींना मनापासून जपणारा.. नाटकात देखील उत्तम कामगिरी केली आणि शाळेला जिल्ह्यात नंबर मिळवून दिला. पण इयत्ता चौथीमध्ये असताना अचानक शाळेत ...