पुस्तक परिचय : आयुष्य बहरताना ...

 

 

 

||श्री||

आयुष्यातील अगदी साध्या क्षणातून दडलेल्या कल्पवृक्षाचे अंकुर शोधण्याचा ध्यास म्हणजे ‘आयुष्य बहरताना’ हे पुस्तक.प्रत्यक्ष प्रवासात काय किंवा आयुष्यात काय जरा जवळची खिडकी उघडली कि नव जग खुल होत.सारखं रडगाण गात बसण्यापेक्षा त्यापलीकडे असलेल सुंदर शोधण ही जीवनाला उद्दिष्ट देण्याची कला आहे.

एकूण  ८० लेख असलेल हे १६८ पानी पुस्तक आहे.आपल्या आजूबाजूला खु गोष्टी आपल आयुष्य समृद्ध करण्यासाठी जणू उभ्या असतात पण आपण आयुष्यात नसलेल्या गोष्टींच दु: मनात ठेवून आयुष्याचा गाडा बऱ्याच वेळा ओढत असतो.आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची क्षमता या पुस्तकात आहे.पुस्तकाच सर्वात महत्वाच वैशिष्ठ्य म्हणजे अतिशय सुंदर अलंकारिक भाषा.

      प्रेरणा देणारी व्यक्तिमत्व,आदर्शवत भूतकाळ,निसर्ग,अध्यात्म,छोट्या गोष्टीतून लहान मनांवर होणारे संस्कार,”वस्तूही साद घालतात”,मैत्री,शिक्षक-विद्यार्थी,शिक्षण पद्धती अशा अनेक अंगाना स्पर्श करणार अस हे पुस्तक आहे.थोडक्यात माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंतच्या प्रत्येक टप्यावर आनंद कुठे दडला आहे हे गुपित खोलणार हे पुस्तक आहे.

या पुस्तकातील एका लेखाचा छोटा भाग मी मुद्दाम पुढे लिहित आहे.जेणेकरून लेखाकाचे लेखन कौशल्य आपणाला जाणवेल.

 

 

 

लेख : प्रकाशाचे पुजारी 

भविष्य ओळखण्याची एक छोटी किल्ली आपल्याकडे असावी ती म्हणजे ‘वर्तमान’ ओळखा! वर्तमान जागृत भविष्य उत्तम! वर्तमान ढेपाळलेला तर भविष्य विस्कटलेल.पूर्व दिव्य ज्यांचे त्यांचा रम्य भाविकाळ.

ज्ञानाचे तप आचरून जी माणसे स्वतः समाधानाने जगून दुसऱ्यालाही ते देण्यासाठी राबतात,त्यांचे हात परमेश्वर हातात घेतो! असा लेखक,असा प्राचार्य,असा सेवक,असा नेता,असा कार्यकर्ता निसर्गात दडलेल्या उर्जेला आवडतो.आज अशा प्रकाशाच्या पुजाऱ्यांची ,प्रकाशाच्या साधकांची गरज आहे.

१६९ पाने असलेल्या पुस्तकातील सात ते आठ वाक्ये जर आपल्याला एवढी  प्रेरणा देत असतील तर पूर्ण पुस्तक म्हणजे मेजवानीच!

 

 

पुस्तक अभिप्राय लेखन : सौ.अबोली निलेश फणसळकर.

 

 

 

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुस्तक परिचय -माझे विद्यार्थी 💐लेखक - रघुराज मेटकरी