पुस्तक परिचय : आयुष्य बहरताना ...
||श्री | | आयुष्यातील अगदी साध्या क्षणातून दडलेल्या कल्पवृक्षाचे अंकुर शोधण्याचा ध्यास म्हणजे ‘आयुष्य बहरताना ’ हे पुस्तक. प्रत्यक्ष प्रवासात काय किंवा आयुष्यात काय जरा जवळची खिडकी उघडली कि नव जग खुल होत.सारखं रडगाण गात बसण्यापेक्षा त्यापलीकडे असलेल सुंदर शोधण ही जीवनाला उद्दिष्ट देण्या ची कला आहे. एकूण ८० लेख असलेल हे १६८ पा नी पुस्तक आहे.आपल्या आजूबाजूला खु प गोष्टी आपल आयुष्य समृद्ध करण्यासाठी जणू उभ्या असतात पण आपण आयुष्यात नसलेल्या गोष्टींच दु : ख मनात ठेवून आयुष्याचा गाडा बऱ्याच वेळा ओढत असतो.आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची क्षमता या पुस्तकात आहे.पुस्तकाच सर्वात महत्वाच वैशिष्ठ्य म्हणजे अतिशय सुंदर अलंकारिक भाषा. प्रेरणा देणारी व्यक्तिमत्व, आदर्शवत भूतकाळ,निसर्ग,अध्यात्म, छोट्या गोष्टीतून लहान मनांवर होणारे संस्कार, ”वस्तूही साद घालतात ”,मैत्री ,शिक्षक-विद्यार्थी,शिक्षण पद्धती अ...